Amit Shah Raigad : कवड्यांची माळ, पगडी ते मेघडंबरी; अमित शाहांचा रायगडावर सत्कार
राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही तर त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या बाल शिवाला हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा देखील विचार त्यांनी दिला ह्या ऐतिहासिक स्थळावर सुवर्ण सिंहासन स्थापन झालं तेव्हाचे वर्णन करणं खरंच अवघड आहे चारही बाजूनं शत्रूंनी घेरलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बांधला गेला आणि दिल्ली ते अटकपर्यंत सीमा गेल्यात स्वराज्याची कल्पना येणं देखील त्याकाळात अवघड होतं स्वधर्म आणि स्वराज्याचे महत्त्व नंतर कळायला लागले मी अनेक नायकांची पुस्तकं वाचलीत मात्र अपराजित सेना निर्माण करणं छत्रपतींशिवाय कोणीही नाही करु शकलं २०० वर्षांपासूनच्या मुगलशाहीतून स्वतंत्र केलं बंगाल, तामिळनाडू, दिल्लीपर्यंत पोहोचलो तेव्हा कळलं आपलं स्वधर्म वाचला १०० वर्ष होईल आपल्या स्वातंत्र्याला तेव्हा आपण पहिल्या क्रमांकावर असू याची स्थापनाच छत्रपतींनी केली आलमगीर बोलणारा पराजित झाला आणि त्याची समाधी इथेच झाली भारताच्या मुलांना आपला इतिहास शिकवलाच पाहिजे महारीष्ट्रापर्यंत छत्रपतींना सिमीत ठेऊ नका, जग प्रेरणा घेत आहे आक्रमणकाऱ्यांनी आपल्याला गुलामीच्या मानसिकतेत टाकले होते अशात छत्रपतींनी स्वराज्याची संकल्पना मांडली होती मी राजकारण करायला आलेलो नाही मी इथे प्रेरणा आणि अनुभूती घ्यायला आलेलो आहे शिवमुद्राचा संदेश आदर्श संदेश आहे चेतना सुचित केली ती हिंदवी स्वराज्याची वाहक बनली शिवराज्यभिषेक झाला ती जागा हिच, जन्म झाला हीच आणि शेवटचा श्वास देखील इथेच घेतला टिळक यांना देखील मी प्रणाम करेल हा किल्ला तोडण्याचे काम इंग्रजांनी केलेले टिळक महाराज यांनी छत्रपतींचे मूलमंत्र घेतले होते आणि त्यांनी किल्ल्यासाठी संघर्ष केला आणि स्मारक इथेच उभारले गेले रायगड पर्यटन नव्हे तर प्रेरणा स्थळ तयार करणार आहोत पुरंदरेंना देखील अभिवादन करतो, त्यांचे देखील योगदान मोठे शिवाजी महाराज यांनी प्रशासन क्षेत्रात अनेक सिद्धांत स्थापित केले, जे कॅबिनेट मंडळ त्यातीलच एक आहे सुशासन कसे असावे याचा दृष्टांत त्यांनी स्थापित केला स्वधर्माची लढाई कधी थांबली नाही पाहिजे भारताला संपूर्ण विश्वास प्रस्थापित करण्याचे काम मोदीजी करत आहेत रामजन्म भूमीचा उद्धार आणि काशीविश्वनाथ कोरिडोर निर्माण करण्याचे काम देखील मोदीजी करत आहेत शिवाजी महाराजांचा अर्थ संकल्प, बलिदान, शौर्य, स्वाभिमान, आणि स्वराज्याची जीजीविशा आहे देवाने मला कालिदांसांपेक्षा उत्तम कवी जरी केले तरीही मी मेघडंबरीसमोर उभा राहिल्यावर याची भावना मी व्यक्त नाही करु शकत