¡Sorpréndeme!

Devendra Fadnavis Raigad Speech : अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारणारच; फडणवीसांची ग्वाही

2025-04-12 0 Dailymotion

Devendra Fadnavis Raigad Speech : अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारणारच; फडणवीसांची ग्वाही

 भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय जय जय भवानी, हर हर हर महाराष्ट्राची कुलस्वामी. आई तुळजा भवानी, राष्ट्रमाता, राजमाता, आई जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना. करतो आणि आज शिव पुण्यतिथीच्या निमित्ताने रायगडावर आयोजित या अभिवादन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याकरता आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता आपल्यामध्ये आलेले भारत देशाचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री. आदरणीय अमित भाई शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजित दादा पवारजी, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले, श्रीमंत छत्रपती, शिवेंद्रराजे भोसले, मुरलीधर मोहळजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, आशीष शेलार जी, भरत शेठ गोगावलेजी, आदितीताई तटकरे या... आपल्या स्मारक समितीचे अध्यक्ष रघुजी राजे आंगरे, मंचावर उपस्थित प्रवीणजी दरेकर, धैर्यशीलजी पाटील, प्रशांतजी ठाकूर, महेशजी बालडी, विक्रांत ठाकूर, आज जगदीशजी कदम, त्रिंबकजी पुरोहित, ज्यांना आपण पुरस्कार दिला, ते उदयसिंहजी होळकर, सुधीरजी थोरात, संजयजी कुलकर्णी, ज्यांनी संपूर्ण दुर्ग. पादक्रांत केले असे पाटील साहेब, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शिवप्रेमी, भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय समाधान आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा आणि संपूर्ण मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा ज्यांनी गाढा अभ्यास केला. जगभरातन इतिहासाचे पुरावे मिळवून ज्यांनी हा इतिहास समजून घेतला आणि त्या इतिहासाचं वाचन आणि लेखन दोन्ही केलं ते भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा या ठिकाणी आलेले आहेत.