Amit Shah Raigad : रायगडावर गृहमंत्री अमित शाह शिवरायांपुढे नतमस्तक
छत्रपती शिवाजी महाराजांची 345 व्या पुण्यतिथीनिमित्य गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं आहे. यावेळी रायगडावर आयोजित कार्यक्रमासाठी ते दाखल झाले आहे.रायगडला जाण्यासाठी ते कालच पुण्यात दाखल झाले आहेत. पुण्यातील रिट्झ कार्लटन हॅाटेल येथे शाह हे मुक्कामाला होते. प्रोटोकॉल नुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मुरलीधर मोहोळ स्वागतासाठी उपस्थित होते. त्यानंतर आज अमित शाह हे किल्ले रायगडाच्या दिशेने मार्गस्थ झाले.केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सर्वप्रथम पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊच्या समाधीचे दर्शन घेत वंदन केलं. त्यानंतर ते रोपवे परिसरात दाखल झालेत.यावेळी मोठा पोलिसांच्या ताफ्यासोबत अमित शाह यांचा ताफा पाचाड येथून रोपवे परिसरात आला आले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोबत प्रवास केला आहे.