¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines 9 PM Top Headlines 9 PM 11 April 2025 रात्री 9 च्या हेडलाईन्स

2025-04-11 0 Dailymotion

ABP Majha Headlines 9 PM Top Headlines 9 PM 11 April 2025 रात्री 9 च्या हेडलाईन्स 
मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजारांनी साताऱ्यात सुरू केली, उदयनराजेंच्या विधानाने नवा वाद...इतिहासाशी छेडछाड न करण्याचा सपकाळांचा सल्ला...तर राजाविरोधात कसं बोलणार, भुजबळांचा खोचक टोला... 
एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने १२० कोटींचा निधी, दरमहा ७ तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन, प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट 
अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचू देत नाहीत, प्रताप सरनाईकांचा आरोप...एसटीसाठी ९२८ कोटी मागितले,  पण केवळ २७२ कोटीच मिळाल्याची माहिती... 
अमित शाहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वातावरण तापलं...गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळाले नाही तर मोठा उठाव, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा...इतरांची संयमाची भाषा... 
शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोटकरची जामिनावर सुटका...कोल्हापुरातून कोरटकर मुंबईत... मात्र मुंबईतून  नागपूर कनेक्टेड प्लाईटमध्ये बसले नसल्याची माहिती...