¡Sorpréndeme!

Eknath Shinde On Shahaji Bapu : त्याला वाऱ्यावर सोडणार नाही..,एकनाथ शिंदेंचा शहाजी बापूंना वादा

2025-04-11 2 Dailymotion

Eknath Shinde On Shahaji Bapu : त्याला वाऱ्यावर सोडणार नाही..,एकनाथ शिंदेंचा शहाजी बापूंना वादा

शहाजी बापू हरले जरी असले तरी विराट कोहली एक मॅच हरला म्हणजे त्याची बॅट तळपायची राहत नाही .. पुढच्या मॅच मध्ये ती जोराने तळपते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरी आणते .. शहाजी बापूंचे असेच आहे, बापू म्हणजे टायगर अभी जिंदा है अशी शेरेबाजी करत शहाजी बापूंना वाऱ्यावर सोडणार नाही असे स्पष्ट संकेत आज एकनाथ शिंदे यांनी सांगोल्यात बोलताना दिले . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजी बापू यांना गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पराभूत केले होते. मात्र याला बापून पासून दूर जाऊन बंडखोरी केलेले दीपक साळुंखे यांच्यातील मत विभागणी कारण ठरली होती. आज दीपक साळुंखे आणि बापू एकाच गाडीतून आलेले पाहून एकनाथ शिंदे यांनी चांगलीच टोलेबाजी केली. बापूंच्या बाबतीत एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात बापूंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना मोकळे ठेवणार नाही अशा शब्दात बापूंच्या पुनर्वसनाचे संकेत दिले. 
     आम्ही जेव्हा उठाव केला होता तेव्हा सर्वजण तणावात होते मात्र त्यावेळी बापू खंबीरपणे माझ्या सोबत उभा होता . यावेळी आम्ही तणावात होतो मात्र बापू या वेळेला बोलत सर्वांचा तणाव घालवत होता. मी डॉक्टर नसलो तरी अनेक मोठे ऑपरेशन केली आहेत आणि त्यात बापूंची काय ती झाली काय तो डोंगर यामुळे गुवाहाटीचे पर्यटन चौपट वाढले .. काही बिल्डर बापूंचे हे डायलॉग त्यांच्या जाहिरातीत देखील वापरत आहेत .. बापूंना याची माहिती नसावी नाहीतर त्यांनी त्याच्याकडून रॉयल्टी घेतली असती असा टोला लगावला. 
      बापूची लोकप्रियता प्रचंड आहे ती सर्वत्र पाहायला मिळते .  आम्हीही बापूंना मोकळे किंवा वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगत शहाजी बापूंचे लवकरच पुनर्वसन केले जाणार असल्याचे स्पष्ट संकेत एकनाथ शिंदे यांनी दिले. एकनाथ शिंदे ज्याच्या पाठीमागे आहे त्यांनी चिंता करायची गरजच नाही असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.