Santosh Deshmukh Murder Case Updates Ujjwal Nikam बीड: बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder Case) आज (10 एप्रिल) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती सर्व देण्यात आली. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला तुमच्या वकिलांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यानंतर न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांनी पुढील सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुनावणीची दरम्यानची माहिती दिली. आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते सील उघडल्यानंतर देऊ, असं उज्ज्वल निकम म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी मागितलेली सर्व कागदपत्र सादर केली. तसेच संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
आरोपीच्या वकिलांनी मागितलेला कागदपत्र सादर केली. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला. व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये,अशा विनंती कोर्टाला केली, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही,असा अर्ज केला आहे. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितले.