¡Sorpréndeme!

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06PM : 10 April 2025: ABP Majha

2025-04-10 1 Dailymotion

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात...दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं...पटियाला हाऊस कोर्टात हजर करुन न्यायालयान कोठडीची मागणी करणार

अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालण्याची शक्यता...सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती...

पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या दावा...

बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचं राणा फेस्टिव्हल सुरूच राहणार, संजय राऊतांचा टोला...पाकिस्तानातल्या जेलमध्ये अडकलेल्या कुलभूषण यादवना भारतात आणण्याचं दिलं आव्हान...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराला सरकारकडून कात्री, निधीच्या कमतरतेमुळे मार्च महिन्यात मिळाला केवळ ५६ टक्के पगार...एसटी महामंडळानं पगारासाठी राज्य सरकारकडे मागितले एक हजार कोटी...

राज्य सरकारकडून मंत्र्यांसाठी एक कोटींची आयपॅड खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी

अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय यांचा आज साखरपुडा.. नातवाला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवार उपस्थित.

सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री १२ एप्रिलला रायगड दौऱ्यावर,

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा

मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो, पाच वर्षे 288 आमदारांचं सभागृह चालवलंय...अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळांचं मिश्कील वक्तव्य...

चैत्री नवरात्रात सप्तश्रृंगी गडावर तोबा गर्दी...गर्दी वाढल्यानं बॅरीकेड्सच्या दोऱ्या तुटल्या...तर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली नसल्याचं मंदीर प्रशासनाचं स्पष्टीकरण

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, दोन हजार रुपयांनी दर वधारले, जीएसटीसह सोन्याचा प्रतितोळा भाव ९४ हजारांवर

चेन्नईचा ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर... महेंद्रसिंग धोनी पुन्हा बनला चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार... २०२३ नंतर धोनीकडे पुन्हा सीएसकेची धुरा

२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश... आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब... १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार