¡Sorpréndeme!

Pune Ajit Pawar : सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतायत का? अजितदादा स्पष्टच बोलले..

2025-04-10 0 Dailymotion

Pune Ajit Pawar : सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतायत का? अजितदादा स्पष्टच बोलले..
 पान टपरी ते विधानसभा उपाध्यक्ष असा अण्णा बनसोडे यांचा प्रवास आहे. या प्रवासात बनसोडेंनी बरेच चढ उतार पाहिले. यावर मात करत सामान्य कुटुंबातून आलेले अण्णा या पदावर पोहचलेत.  - अचानक आयात शुल्क वाढल्यानं जगातल्या अनेक देशात याचा परिणाम जाणवत आहेत. कोरोना नंतर हे एक नवं संकट आलेलं आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशात चांगले संबंध जोडलेले आहेतच, याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो.  लोकसंख्या वाढायला वेळ लागत नाही. लोकांनी मनावर घेतल की लोकसंख्या वाढते, अस म्हणत अजित पवार पुन्हा घसरले, ब्रेकिंग न्यूज अस मिश्किलपणे म्हणत वेळ मारून नेली.  -मेहरबानी करून रस्ते रुंद करा, नवीन डीपी करत असताना स्पष्ट संकेत आहेत, 24, 36 मीटर करा, कमी करू नका  -91 पासून ते आजपर्यंत 10 पट लोकसंख्या वाढणंर आहे,त्यामुळे मोठे रस्ते नको,उद्यान नको  -मला 6 -6 वेळा उपमुख्यमंत्री पद मिळालं मी समाधानी आहे  -AI साठी 700 कोटीची तरतूद केलीय   -रिंग रोड मध्ये कुणाच्या जागा,प्रॉपर्टी विहरी जातील 5 टक्के लोकांचं नुकसान होईल मात्र 95 टक्के लोकांचा फायदा होणार मात्र हे होत असताना आपण 5 टक्के लोकांना वाऱ्यावर सोडून जमणार नाही त्याची सोय केली पाहिजे  -कायदा व्यवस्था सुरळीत ठेवा, कोयता गॅंग, अमुक गॅंग, तमुक गॅंग हे चालणार नाही. मी पोलीस आयुक्तांना बोललोय, आता तुम्हाला आयुक्तलय देतोय.  -अण्णा तू दिसायला बारका असला तरी मूर्ती लहान आणि कीर्ती महान अस म्हटल जात, यांची कीर्ती महान आहे...  -ही मूर्ती मोठी , किर्ती तुम्हाला च माहिती..गडी अंगणी उभा अन आडवा त्याच्या रुपात गोडवा, (अस माजी आमदार विलास लांडे यांच्याबद्दल बोलले, मोहिणीला (लांडे यांची पत्नी) विचारावं लागेल,)  -वागण्याकडे, बोलण्याकडे सर्वांच बारीक लक्ष असत. परिवाराकडे ही लक्ष असत. चिरंजीवाकडे काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत. मी देखील माझ्या चिरंजीवाला सांगतो. मोठ्या पदावर गेल्यास आपले घरातले नातेवाईक काहीतरी बोलतात आणि बदनामी होते, आपल्या पक्षाची होते,   -शरद पवारांना काल ही दैवत मानतो आज ही मानतो...तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत.  माजी आमदार विलास लांडे यांना उद्देशून शेरो शायरी -खामोशी से अपने मेहनत को अंजाम दो विलास लांडे... कामयाबी शोर मचायेगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर, अनेक जण म्हणायचे की विलास लांडे कोणाकडे आहे, मी म्हणायचं काही जण सर्वपक्षीय असतात..