Tuljapur Drugs Case : कशी झाली तुळजापुरात ड्रग्जची एन्ट्री? तस्करांवर राजकीय वरदहस्त Special Report
देवाच्या दरबारात भाविक श्रद्धेनं जातात... डोकं टेकतात, आणि भरभराटीची मागणी करतात. पण याच देवाच्या दरबारात बसलेले काही पुजारी मात्र देवाच्या आडून अवैध धंदे करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. हे घडलंय अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवता असणाऱ्या तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या मंदिरात. याच मंदिरातील १३ पुजारी ड्रग्ज प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. हे सगळं रॅकेट चालवणारी एक महिला आहे. ही ड्रग्स क्वीन नेमकी कोण आहे? तिचे आणि आरोपींचे काही राजकीय लागेबांधे आहेत का? तुळजापूरसारख्या पवित्र ठिकाणाला ड्रग्सचा डाग कोण लावतंय? पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट
तुमची-आमची...महाराष्ट्रातल्या कोट्यवधींची कुलदेवता..
मात्र तुळजाभवानीची पूजा करणाऱ्यांपैकी अनेकांच हात ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात गुंतलेत..
होय... ड्रग्ज रॅकेटमध्ये एक दोन नव्हे, तर तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत..
त्यामुळे देवीचे काही पुजारी तुळजापूरचे वैरी झाल्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे..
आता या पुजाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल
आरोपींच्या यादीत असलेल्या पुजाऱ्यांचा, तुळजाभवानीच्या पूजेशी संबंध नसल्याचा सूर पुजारी मंडळानं आळवलाय..
तर पुजाऱ्यांना बदनाम करणं हे राजकीय षडयंत्र आहे असा घंटानाद देखील काही पुजाऱ्यांनी केलाय.
आता कोणत्या पुजाऱ्यानं ड्रग्जचं भस्म कपाळाला लावलंय, हे तपासाअंती समोर येईलच...
मात्र तुळजापूरला ड्रग्जच्या विळख्यात ढकलणारा चेहरा आहे या महिलेचा..
संगीता गोळे...
खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या संगीता गोळेनं किती तरुणांचं भविष्य असुरक्षित केलंय, कुणास ठाऊक?
ड्रग्ज क्वीन संगीता गोळे आहे तरी कोण, पाहुयात
राजकीय नेत्याशी निगडित सुरक्षा एजन्सीत सुरक्षारक्षक म्हणून काम
अनेक वर्षे तपास यंत्रणांना चकवा देत ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात
संगीता गोळेेचा पती वैभव, दीर अभिनव देखील ड्रग्ज तस्करीच्या धंद्यात
ड्रग्ज क्वीन संगीताकडे घबाड - सब हेडर
बँक खात्यात ५ कोटी
२५ तोळे सोनं
चार कार
मुंबई आणि लोणावळ्यात मालमत्ता
म्युच्युअल फंडमध्ये मोठी गुंतवणूक
आता या संगीता गोळेनं तुळजापुरात कुणाकुणाला हाताशी धरलं होतं, याची माहिती देखील एबीपी माझाच्या हाती लागली आहे..
मुंबईत ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिंटू मुळेची ड्रग्ज क्वीन संगीता गोळे आणि तिचा पती वैभवशी गाठभेट
पिंटू मुळे चंद्रकांत उर्फ बापू कनेच्या संपर्कात आल्यानंतर तुळजापुरातला ड्रग्जचा व्यवहार वाढला
मुंबई ते तुळजापूर व्हाया सोलापूर असा ड्रग्जचा प्रवास
मुंबईतून आलेली पाच ग्रॅम वजनाची ड्रग्जची पुडी तुजळजापुरात दोन पुड्यांमध्ये विभागली जायची
३ हजार प्रतिग्रॅम दराने तुळजापुरात ड्रग्जची विक्री
ड्रग्ज तस्करीसाठी आरोपींकडून तुळजापुरातल्या खास हॉटेल्सचा वापर>>
((पोलीस अधीक्षकांचा टीकटॅकमधला पहिला बाईट))
तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती फक्त तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांपुरती मर्यादीत नाहीय..
तर या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पुजारी आणि आरोपी हे राजकीय भक्त असल्याचं उजेडात आलंय..
कोणत्या आरोपीचे कोणत्या पक्षाशी कनेक्शन आहे पाहुयात
आजवर मुंबई, पुण्यासारख्या शहरातली तरुणाई नशेच्या विळख्यात अडकल्याचं आपण ऐकतोय, वाचतोय...
मात्र नशेखोरीचं लोण तुळजापूरसारख्या ग्रामीण पट्ट्यात पोहोचलं असेल तर ही किती मोठी धोक्याची घंटा आहे हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही..
देवीची पूजा करणारे, भक्तांना प्रसाद वाटणारे हात जर तरुणांच्या हातात ड्रग्जच्या पुड्या ठेवत असतील तर त्या हातात लवकरात लवकर बेड्या ठोकल्याच पाहिजेत
अप्पा शेळके एबीपी माझा तुळजापूर