लोकसभा आणि विधानसभेचा ज्वर ओसरलाय.. आता लक्ष महानगरपालिका निवडणुकांकडे आहे.. सगळेच पक्ष त्यासाठी तयारी करत आहेत.. राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. स्वत: अजित पवार रणनीती घेऊन मैदानात उतरले आहेत.. आठवड्याचे ३ दिवस शासकीय काम, तर उरलेले ४ दिवस महाराष्ट्र पिंजून काढायचं त्यांनी ठरवलंय.. राष्ट्रवादीची छबी सुधारण्यासाठी आणि मतदार टिकवण्यासाठी काय आहे दादांची रणनीती? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.
यह अजितदादा का स्टाईल है...
आणि आता अजित पवारांनी महापालिका निवडणुकांसाठी कामाची स्टाईल म्हणजेच रणनीती आखलीय..
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बारामती पिंजून काढणारे अजितदादा, आता महापालिका निवडणुकांसाठी पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरणार आहेत..
गुरुवार ते रविवार महाराष्ट्र दौरा करणार
पक्षाचे मंत्री, विधान परिषद आमदार
राज्यव्यापी दौैऱ्याचं वेळापत्रक आखणार
दौऱ्यादरम्यान पदाधिकारी मेळावे, सदस्य नोंदणी
बूथ नोंदणी, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना
बोलघेवड्या म्हणा किंवा वाचाळवीर...
नको तिथे नको ते बरळणाऱ्या नेत्यांनी अजित पवारांची डोकेदुखी वाढवलीय
या बरळणाऱ्या नेत्यांना अजित पवारांनी फैलावर घेण्यास सुरूवात केली आहे..
कर्जमाफीच्या वक्तव्यामुळे फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर महायुतीचीच डोकेदुखी वाढवणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना त्याचा प्रत्यय आलाय
उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शासकीय अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत माणिकराव कोकाटे अर्धा तास उशीरा पोहोचले. वक्तशीरपणासाठी आग्रही असलेल्या अजित पवारांना ही बाब खटकली. आधीच माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या नेत्यांना उत्तरं द्यावी लागताहेत.. त्यामुळे माणिकराव कोकाटेंंना अजित पवारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे जनता दरबार आणि पक्ष कार्यालयातील गैरहजेरीवरूनही अजित पवारांनी कोकाटेंची कानउघडाणी केलीय. ))
आता वाचाळवीर नेत्यांसाठी अजित पवारांनी कोणती आचारसंहिता जाहीर केलीय पाहुयात
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना सज्जड दम
दोन चुकांनंतर तिसऱ्या चुकीला माफी नाही
बोलघेवड्या मंत्र्यांना पदावरुन हटवणार
एकीकडे वाचाळवीर नेत्यांना सावरायचं, दुसरीकडे आपला मूळ मतदार सांभाळायचा अशी कसरत अजितदादांची सुरु आहे. काका पुतण्याची राष्ट्रवादी एकत्र असताना मुस्लिम मतांवर त्यांची भिस्त होती. मात्र भाजप-शिवसेनेसोबत गेल्यामुळे तो मतदार मोठ्या प्रमाणावर शरद पवारांकडे वळला. तो राखण्याचं आव्हानंही अजितदादांसमोर आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवारांच्या नेतृत्त्वात अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी अमित शाहांची भेट घेणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
महायुती महापालिका निवडणुका एकत्र लढणार आहे..
त्यामुळे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी अजितदादांना मित्रपक्षांशी झगडावं लागणार आहे
आणि प्रत्यक्ष राजकीय आखाड्यात काका आणि त्यांच्या मविआतल्या मित्रपक्षांशी लढावं लागणार आहे...
लढाई सोप्पी नसल्यानं अजित पवार आत्तापासूनच कामाला लागलेले दिसताहेत...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा