भारतातले भाजपचे मंत्री पाकिस्तानच्या क्रिकेटर अंडर काम करणार आहे.
कोणाच्या घरी जावेद बिर्याणी खायला आला होता तो फोटो अजून विसरून गेला नाही..
बाळासाहेब यांनी जावेद मियादादला नव्हता बोलावलं.
वेळ आली तर पाकिस्तानात जाऊन सुद्धा भारत माता की जय म्हणेल..))
उद्धव ठाकरेंच्या सामना मधून काल भाजपवर यथेच्छ टीका करण्यात आलीे.
राष्ट्रभक्तीचं सोंग करणारी भाजप क्लीन बोल्ड अशा मथळ्याखाली ताशेरे ओढले गेेले.
त्यातही आशिष शेलार हे सामनाच्या निशाण्यावर होते.
तुम्हाला वाटेल असं कोणतं पातक भाजपकडून आणि शेलारांकडून घडलं.. तर ऐका
याला कारण ठरलंय आशियाई क्रिकेट काऊन्सिल.
या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मोहसीन नक्वी यांनी गेल्या आठवड्यात स्वीकारली.
याच कार्यकारणीत भाजप आमदार आशिष शेलार यांचीही पदसिद्ध सदस्य म्हणजे एक्स ऑफिसिओ म्हणून वर्णी लागली.. त्यावरुन पाकिस्तानी नक्वींसोबत शेलार काम करणार असा सूर सामनाने आळवला आहे.
हे भाजपचं छुपं पाक प्रेम आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यावर आशिष शेलारांनी संजय राऊतांच्या भाषेतच उत्तर दिलंय.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू जावेद मिंयादादने मातोश्रीवर घेतलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचीही आठवण शेलारांनी करुन दिलीय
संजय राऊत यांनी मिंयादाद-बाळासाहेब भेटीबाबत स्पष्टीकरण देत आपली टीका सुरुच ठेवली.
खरं तर आशियाई क्रिकेट काऊन्सिलची स्थापना भारताच्या पुढाकारानेच ८३ साली झाली होती.
दर काही वर्षांनी याचे सदस्य, अध्यक्ष, कार्यकारिणी बदलत असते. माजी खासदार, काँग्रेसचे राजीव शुक्ला हे सध्या acc चे एक्झिक्युटिव मेंबर आहेत हे विशेष.
भारतात क्रिकेट हा धर्म मानणारे जोवर आहेत तसेच क्रिकेटमध्ये धर्म आणणारेही जोवर आहेत.. तोवर सामनाने केली तशी टीका आणि संजय राऊत आणि आशिष शेलार असा सामना सुरुच राहिल. विपर्यास करण्याच्या नादात क्रिकेटवर आणि क्रिकेटप्रेमींवर अन्याय होणार नाही एवढीच माफक आशा.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.