कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर पाच दिवस पोलिस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता. 30 मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ट न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन मंजूर केला.
नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना कॉल करुन धमकी दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर इंद्रजीत सावंत यांनी कोल्हापूरमध्ये कोरटकर विरोधात तक्रार नोंद केली होती.
या प्रकरणी प्रशांत कोरटकर एक महिन्याहून अधिक काळ फरार होता. कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली. त्यानंतर कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याला आधी पाच दिवसांची पोलिस कोठडी आणि नंतर 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.