महापुरुषांवरील चित्रपट येत असेल आणि त्यावरुन वाद झाला नाही असं कधी झालं नसेल.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे, त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील काही दृश्यांना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला. हा चित्रपट जातीय द्वेष वाढवेल अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय.
सगळ्या विषयात आपलं मत मांडणाऱ्या सचिन खरात यांनी तात्काळ आनंद दवेंच्या दाव्याला विरोध केला.
वर्षानुवर्ष काही एकतर्फी चित्रपट दाखवले गेले त्यावेळेस तुम्ही आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
हे सगळं एकिकडे सुरु असताना "फुले" चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली.
या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे, अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला आहे असं मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.
फुले सिनेमाला विरोध करणाऱ्यांना भुजबळांनी काय सल्ला दिलाय तोही जाणून घेऊयात
कोणतीही नवी, क्रांतीकारक भूमिका घेणाऱ्यांना समाजाकडून त्रास सहन करावा लागला आहे.
इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत.
महात्मा फुले यांना त्रास देणाऱ्याचं योग्य चित्रण यायलाच हवं आणि त्रास देणारे केवळ एकाच जातीपुरते मर्यादीत नव्हते हे सत्य सुद्धा आपण स्वीकारायलाच हवं.
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा