¡Sorpréndeme!

ABP Majha Headlines 8 AM Top Headlines 8 AM 08 April 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्स

2025-04-08 3 Dailymotion

सर्वसामान्यांना मोठा झटका, आजपासून घरगुती वापराचा गॅस ५० रूपयांनी महागला, उज्ज्वला योजनेतील सिलिंडरही ५० रूपयांनी महागले 
रिझर्व्ह बँक व्याजदरात आणखी पाव टक्के कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार 
केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रतिलिटर वाढ, पेट्रोलियम कंपन्याना झळ बसणार, ग्राहकांवर भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण 
गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा, निष्कर्षानंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार 
रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉ. घैसास यांचा राजीनामा, तर १० लाख मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मान्य 
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची आज पहिली सुनावणी, दोषी पोलिसांवर कारवाईसाठी सोमनाथ यांच्या आईची याचिका, औरंगाबाद खंडपीठात प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू 
कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीची सुनावणी, एकनाथ शिंदेंवरील विडंबनाप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी