¡Sorpréndeme!

Special Report on Dinanath Hospital:तनिषा भिसेंवर पाच तास उपचार नाही,दीनानाथ रुग्णालयाचं पोस्टमार्टम

2025-04-07 5 Dailymotion

Special Report on Dinanath Hospital:तनिषा भिसेंवर पाच तास उपचार नाही,दीनानाथ रुग्णालयाचं पोस्टमार्टम

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार नाकारल्यानं गर्भवतीचा मृत्यू झाल्याच्या आरोपांनी राज्यात खळबळ उडाली. अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी आंदोलने केली, त्यानंतर दीनानाथ रूग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) त्यांचीच एक समिती नेमून या मृत्यूप्रकरणात रूग्णालयाची चूक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राज्य शासनाचा दीनानाथ रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) घडलेल्या प्रकरणी आता चौकशी अहवाल समोर आला असून यात या प्रकरणी रूग्णायावरची ठपका ठेवण्यात आला आहे, त्याचबरोबर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषद घेत चौकशी अहवालाबाबत माहिती दिली. या अहवालानुसार रुग्णालय दोषी आढळले असून रुग्णालयाने कोणतेही नियम पाळले नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.