¡Sorpréndeme!

Pune Medha Kulkarni : दिनानाथ रुग्णालयाचा दोष न बघता भाजपने उन्माद केला : मेधा कुलकर्णी

2025-04-07 0 Dailymotion

पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणात खासदार मेधा कुलकर्णींची उडी, दीनानाथ रुग्णालयाचा दोष न बघता भाजपकडून उन्माद, डॉ.घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड करणं शोभणारं नाही, शहर अध्यक्ष धीर घाटेंना  लिहलं पत्र, भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी
दीनानाथ रूग्णालयाविरोधातील आंदोलनावरून भाजपमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.. त्याविर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. रुग्णालयाचा दोष आहे की नाही हे न पाहता भाजपनं उन्माद केला,
सोम्या-गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी कायदा हाती घेऊ नये, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना झापलं. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना कुलकर्णींनी खरमरीत पत्रच लिहिलंय.. आंदोलन केलेल्या भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज द्या, असा त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.