¡Sorpréndeme!

Jaya Bachchan Angry on Fan : चाहत्याची 'ती' मागणी...जया बच्चन रागाने लाल, हात पकडून म्हणाल्या...

2025-04-07 1 Dailymotion

Jaya Bachchan Angry on Fan : चाहत्याची 'ती' मागणी...जया बच्चन रागाने लाल, हात पकडून म्हणाल्या...

जया बच्चन पांढऱ्या रंगाचा सलवार-कमीज घालून, काळ्या रंगाचा पर्स घेऊन, दिवंगत अभिनेते मनोज कुमार यांच्या प्रार्थना सभेला आल्या होत्या. या वेळी, त्या उभ्या असताना, एका महिलेने त्यांच्या पाठीवर थाप दिली. जया आश्चर्याने त्यांच्याकडे वळल्या आणि पाहताच त्यांनी त्या महिलेचा हात धरला आणि जोरात फटकारला त्याचबरोबर जया बच्चन यांनी फोटो काढणाऱ्या महिलेच्या पतीलाही फटकारलं. ती महिला जया बच्चन यांच्यासोबत फोटो काढायला आली होती. त्यानंतर जोडप्याने हात जोडून नमस्कार केला आणि सॉरी म्हणाले. पण अभिनेत्रीने असं काही म्हटलं ज्यामुळे दोघेही तिथून निघून गेले.बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा मूड अनेकदा खराब असल्याचं दिसून येतं. त्यांच्या वृत्तीमुळे त्या अनेकदा चर्चेत असतात. कधी त्यांना पापाराझींवर राग येतो तर कधी ती कुणाला तरी फाटकारतात. या काळात त्या हे सर्व पाहून लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार करत नाही. त्या त्यांना योग्य वाटतं तशी प्रतिक्रिया देतात आणि त्यासाठी त्यांच्यावर टीका होते. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत.