दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार..अहवालानंतर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय होणार
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहानांंचा आज नंदुरबार दौरा, कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार.
बारामतीत माझ्याएवढं काम करणारा आमदार यापुढंही मिळणार नाही, अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
छोट्या-छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका, फडवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या, भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, चंद्रपुरात पक्षातील गटबाजीवर नाराजी
सर्व हिंदूंसाठी मंदिर, स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य, भारतातील मुस्लिमांनाही हिंदू समुदाय सामावून घेत असल्याची भूमिका
लग्नास नकार दिल्याने अकोल्यात तरुणीवर चाकू हल्ला...पोटात चाकू भोकसून खून करण्याचा प्रयत्न, आरोपीला बेड्या, तरुणीवर उपचार
विदर्भात तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर.. अकोल्यात सर्वाधिक ४३.२ अंश से. तापमानाची नोंद.. तर पुढील काळात पारा ४५ अंशाच्या वर जाण्याचा अंदाज