कुणी आपल्याला पाणी मागितलं की आपण लगेच देतो.. कारण पाण्यासारखं दुसरं पुण्य नाही.. पण हेच कर्तव्य पार पाडणं वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला चांगलंच भोवलंय.. चित्तांना पाणी पाजल्याने आता त्याच्याच तोंडचं पाणी पळालंय. नेमकं काय घडलंय पाहूया..
माणूसकी अजून जिवंत आहे हे दाखवण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा आहे. तळपत्या उन्हात उजाड रान माळात पाण्याच्या शोधात असलेल्या चित्यांना पाणी पाजण्याचं पुण्य या प्राणी मित्राने बांधून घेतलं हा व्हिडीओ मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावातील असल्याचं बोललं जातंय. हा व्हिडीओ पाहून सर्वांनीच या तरुणाचं कौतुक केलं पण त्याचं हेच पुण्याचं काम त्याला अडचणीत आणेल याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती होय, त्याच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक करण्यापेक्षा त्याच्यावर कारवाई झालीये.
चित्त्यांना माणसाच्या सहवासाची सवय लागेल आणि ते नागरी वस्तीच्या जवळच राहू लागतील .. अशी भीती वनविभागाला वाटते. त्यामुळेच त्यांनी या ड्रायव्हरवर कारवाई केल्याचं स्पष्ट केलंय भुकेल्याची भूक आणि तहाणलेल्याची तहाण जाणणं हे पुण्याचं काम आहे असं आपण लहान पणापासून ऐकत आलोय पण कदाचित या वनविभागाला याचा विसर पडला असावा माणूस झाला काय किंवा प्राणी झाला काय तहानलेल्याला पाणी पाजलंच पाहिजे वनविभागाचा कर्मचारी म्हणून त्याची चूक झाली असेल पण माणूस म्हणून त्याने सर्वांची मनं जिंकलीत ...