PM Modi Pamban Bridge : रेल्वे वाहतुकीसाठी पंबन पुलाचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रामनवमी निमित्ताने मोदी दुपारी 12 वाजता भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्टी सागरी पुलाचं उद्घाटन करणार आहेत. इथून एक ट्रेन आणि बोट रवाना करतील. तसेच पुलाचं संचालनही करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12.45 वाजता रामेश्वरम येथील रामनाथस्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. रामेश्वरममध्ये दुपारी सुमारे 1.30 वाजता ते तामिळनाडूत 8,300 कोटी रुपयाहून अधिक खर्चाच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पाचा शिलान्यास करणार आहेत. तसेच हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. त्यानंतर ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.हा पूल स्टेनलेस स्टील सुदृढीकरण, उच्च दर्जाच्या सुरक्षात्मक रंगसंगतीसह आणि संपूर्णपणे वेल्ड केलेल्या सांध्यांसह तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला अधिक टिकाऊपणा लाभतो आणि देखभाल कमी लागते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन हा पूल दुहेरी रेल्वे मार्गासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विशेष पॉलीसिलोक्सेन कोटिंगमुळे हा पूल गंजपासून सुरक्षित राहतो आणि समुद्रकिनारीच्या कठीण वातावरणात दीर्घकाळ टिकतो