Ayodyha Shreeram janmsohala : अयोध्येत श्रीराम जन्मोत्सव सोहळा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
यंदा रामनवमीला अयोध्येत दोन लाखांहून अधिक दिवे लावले जाणार असून रामकथा पार्कसमोरील घाट तसेच अन्य ठिकाणी यासाठी व्यवस्था असेल. रामकथा पार्कमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी साजऱ्या होत असलेल्या रामनवमीनिमित्त वाहतूक तसेच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असून, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अवजड वाहने पूर्वाचल एक्स्प्रेस-वेवरून पाठविली जातील. ही व्यवस्था महाकुंभच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेत विशेष पोलिस पथक तसेच सोबत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात आहेत. शरयू नदीच्या किनारी पोलिस, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके आणि राज्य आपत्ती निवारण पथकांना सज्ज ठेवले आहे