Pune Hospital ..तर मंगेशकर कुटुंबाला जबाबदारी टाळता येणार नाही:पतित पावन संघटना
R PUNE PATIT PAWAN CHAUPAL LIVE 050425 पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचा आरोप करत अनेक पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने करण्यात आली. यातील पतीत पावन संघटनेने केलेल्या आंदोलनात हॉस्पीटलच्या बाहेर असलेल्या लता मंगेशकर यांच्या नावाच्या फलकाला काळं फासण्यात आलं . मात्र त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांना आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचा असा अवमान करणं योग्य आहे का असा प्रश्न काही पुणेकरांनी उपस्थित केला. मात्र पतित पावन संघटनेने त्यांच्या कृतीचं समर्थन केलंय. जर मंगेशकरांच नाव हॉस्पीटलला असेल तर मंगेशकर कुटुंबाला त्याची जबाबदारी टाळता येणार नाही असं म्हटलंय .