¡Sorpréndeme!

Raj Thackeray on Marathi : मराठीबाबतचं आंदोलन थांबवा, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश

2025-04-05 4 Dailymotion

मुंबई : नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या मनसेसैनिकांना राजआज्ञा देत पुन्हा एकदा मराठीचा (Marathi) आग्रह बोलून दाखवला. यावेळी त्यांनी राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन या बँकेतील व्यवहारात मराठी भाषेचा वापर केला जातो की नाही, याची तपासणी करा, बँकांना निवदेन द्या, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मनसैनिकांनी राज्यभरातील अनेक भागातील बँकेत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरत गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या.

मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपला आदेश मागे घेत मराठीच्या मुद्द्यावरील आंदोलन मागे घेण्याचे आदेश दिले आहे. राज ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र काढून हे आंदोलन थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने बँकांना मराठीचा सन्मान करायला लावायला हवा. कायदा हातात घेण्याची आमचीही इच्छा नाही. तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रातून म्हटले आहे. महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असे आदेशही त्यांनी यावेळी मनसेसैनिकांना दिले आहे.