¡Sorpréndeme!

Pune Deenanath Hospital : दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले योजनेचा लाभ मिळत नाही

2025-04-05 4 Dailymotion

पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. रूग्णालयाने उपचारांसाठी 10 लाख रूपये भरण्याची मागणी केली, मात्र त्यांचे कुटुंबीय पैसे जुळवाजुळव करतो, तोपर्यंत तीन लाख रूपये भरतो सांगत अतानाही उपचार सुरू केले नाहीत. त्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने त्या गर्भवती तनिषा भिसे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अनेक कारनामे आणि गोष्टी बाहेर येत आहेत. दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णालयाची आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. (Dinanath Mangeshkar Hospital)

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. मंगेशकर हॉस्पिटलने एका रुग्णाला चक्क पेपरवर महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही असं लिहून दिलं आहे. परशुराम हिंदू सेवा संघाने यावरती आक्षेप घेतला आहे. तर सरकारने सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी घोषित केलेल्या योजनेच काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात गरीब आणि गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आहे, जेणेकरून ते आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणार नाहीत. या योजनेत, रुग्णालयात दाखल होणे आवश्यक असलेल्या गंभीर आजारांसाठी लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा दिली जाते.