Sanjay Raut on Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. तेथे त्यांनी अवकाळीमुळे खराब झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्याने माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबाबत विचारलं. यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना (Farmers) खडेबोल सुनावले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, माणिकराव कोकाटे म्हणजे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे हे राजकारणात अनेक वर्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा प्रकारचे वक्तव्य करू नयेत. ते अशी विधानं का करत आहेत? अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम घातला नाही तर यांचे काही खरे नाही. तिघांची भाषणं ऐकली तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केले आहेत. स्वतः अजित पवार हे कॉमेडी शो करत आहे. सध्या त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल त्यांचा देखील कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. राज्याचे कृषीमंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत. खिल्ली उडवत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.