¡Sorpréndeme!

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha

2025-04-05 0 Dailymotion

मंगेशकर रूग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबाबतचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता, आजही रूग्णालयाबाहेर काही संघटनांच्या आंदोलनाची शक्यता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड, भाजप महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल, डॉ. घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे २० लाख रूपये मागितल्याचा होता आरोप


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना....धर्मादाय रुग्णालयातील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश

घटस्फोटानंतर पोटगीविरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, लग्नाचे पुरावे देण्यासाठी करूणा मुंडेंना आजची मुदत

बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप, कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार

बीड जिल्हा कारागृहातील हाणामारीचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच, महादेव गित्तेचा आरोप, कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावर हल्ला केल्याची गित्तेची तक्रार

कर्जमाफीच्या मुद्दयावर कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल, कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करण्याऐवजी शेतीत गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल, शेतकऱ्यांत नाराजी