¡Sorpréndeme!

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 05 April 2025

2025-04-05 0 Dailymotion

जुळी मुले असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही, अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल...
अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबीयांचा दावा...तर राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता

दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉ. घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड, भाजप महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल, डॉ. घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबाकडे २० लाख रूपये मागितल्याचा होता आरोप

घटस्फोटानंतर पोटगीविरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी, लग्नाचे पुरावे देण्यासाठी करूणा मुंडेंना आजची मुदत

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चार सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू...गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना.

मुंबईकरांना लवकरच मेट्रो ३ चं गिफ्ट मिळणार,१० ते १५ एप्रिल दरम्यान मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता,दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाका पर्यंत धावणार मेट्रो...

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान...काही ठिकाणी गारपीट झाल्यानं काजू, आंब्यासह अनेक पिकाचं नुकसान...आणखी तीन दिवस अवकाळीचा अंदाज