पुणे : शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Hospital) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनं समाजमन हादरुन गेलं असून विविध पक्ष आणि संघटनांनी आज रुग्णालयाबाहेर जाऊन आपला आक्रोश व्यक्त केला. आधी 10 लाख भरा मगच महिलेवर उपचार सुरू करु, अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याने संबंधित महिला तनिषा भिसे यांना इतर रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. दरम्यान, त्या महिलेची प्रसुती झाली, तिने जुळ्या मुलींना जन्मही दिला. मात्र, त्यानंतर आपला जीव सोडला. रुग्णालय (Pune) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगत पीडित कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, शासनानेही याप्रकरणाची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार केवळ पैसे मागितल्यामुळे दिशाभूल करणारी करण्यात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, या घटनेनवरुन महिला आक्रमक झाल्या असून रुग्णालयाबाहेर आंदोलन केले जात आहे.
मृत गर्भवती महिला तनिषा भिसे ह्या 15 मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या होत्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते, परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत असे सांगत मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने आपला अहवाल दिला आहे. त्यामुळे, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होम येथे जाऊन तोडफोड केली आहे.
पुण्यातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. दिलीप घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होम येथील रुग्णालयात जाऊन कार्यालयाची तोडफोड केली आहे. या डॉक्टर घैसासचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय अशी घोषणाबाजी देखील संतप्त आंदोलक महिलांनी यावेळी केली.