¡Sorpréndeme!

Deenanath Hospital Pune : दीनानाथ रूग्णालयाच्या फलकावर काँग्रेसची शाईफेक, ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

2025-04-04 0 Dailymotion

Deenanath Hospital Pune : दीनानाथ रूग्णालयाच्या फलकावर काँग्रेसची शाईफेक, ट्रस्टींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी




पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. मात्र, त्या दोन चिमुकल्या जीवांना वाचवण्यात यश आलं. त्या गर्भधारणेचे महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आल्याने त्यांना रूग्णालयात ठेवण्यात आलं आहे. त्या दोन बाळांची प्रकृती कशी आहे त्याबाबत सुर्या रुग्णालयानं माहिती दिली आहे. 

'त्या' जुळ्या बाळांची प्रकृती कशी?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा दुर्दैवी अंत झाला. पण उपचारापूर्वी त्यांनी पिंपरी चिंचवडच्या वाकड इथल्या सूर्या हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यां मुलींना जन्म दिला. या दोन्ही चिमुकल्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झाला आहे. एका मुलीचं वजन एएक किलो 122 ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन 640 ग्रॅम आहे. सुरुवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आता दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दोन्ही मुली  सातव्या महिन्यातच जन्माला आल्याने त्या एनआयसीयू मध्ये आहेत. एका मुलीचं वजन एक किलो 122 ग्रॅम तर दुसऱ्या मुलीचं वजन 640 ग्रॅम आहे. सुरवातीला एका मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आता तिला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आहे.दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर आहे. बाळांचे नातेवाईक रोज सकाळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत. दोन्ही बाळांची प्रकृती सुधारत आहे.