Pune Deenanath Hospital:'त्या' गर्भवती महिलेसोबत काय घडलं?कुटुंबियांवर शोककळा,नातेवाईकांचा आरोप काय?
पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. प्रसूतीचा त्रास होत असणाऱ्या तनिषा भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) दाखल करण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने (Dinanath Mangeshkar Hospital) रुग्णाला दहा लाख रुपयांची मागणी केली.दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमावावा लागला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. या रूग्णालयाच्या समोर आंदोलन केलं जात आहे. त्याचबरोबर या रूग्णालयाची या घटनेनंतर चौकशी सुरू आहे. अशातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तज्ञांची समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा अहवालही समोर आला आहे.(Dinanath Mangeshkar Hospital)
तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार
याप्रकरणी रुग्णालयाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून अहवाल तयार केलेला आहे .
1. वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर
2. डॉक्टर अनुजा जोशी वैद्यकीय
3. डॉक्टर समीर जोग अतिदक्षता विभाग प्रमुख
4. श्री सचिन व्यवहारे प्रशासक