¡Sorpréndeme!

Pune Mother Died : रुग्णालयाकडून 10 लाखांची मागणी, आमदाराची पोलिसांत धाव, नेमकं प्रकरण काय?

2025-04-04 1 Dailymotion

Pune Mother Died : रुग्णालयाकडून 10 लाखांची मागणी, आमदाराची पोलिसांत धाव, नेमकं प्रकरण काय?

 पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू  महिलेला दिनानाथ मधून सूर्या रुग्णालयात हलवले तिथे तिची प्रसूती झाली प्रसूती झाल्यानंतर तिची तब्येत बिघडली त्यानंतर तिला मनिपाल रुग्णालयात हलवण्यात आले तिथे तिच्यावर उपचार करताना तिचा मृत्यू झाला उपचार करण्यासाठी महिलेला उशीर झाला, त्यामुळे तिची प्रकृती ढासळली आणि त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला   महिलेचा मृत्यू हा मनिपाल रुग्णालयात झाला   आमचं सगळ्यासोबत बोलणं झालयं  डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितले की तुम्हाला परव़डत नसेल तर ससूनला जाऊ शकता तिथे ही चांगले उपचार होतात डॉ. घैसास असं त्यांच नाव होत आम्ही सांगितले आम्ही ३ लाख भरुन रुग्णावर उपचार तरी करायला पाहिजे होत २ ते ३ तास त्यांनी वाया घालवले मग आम्ही सूर्या रुग्णालयात गेलो डॉ. सुश्रीत घैसास होते त्यांनी आम्हाला सांगितले सगळे पैसे भरावेच लागेल   तनिषा भिसे माझी वहिनी लागते २८ तारखेला रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मध्ये नेलं होतं डॉक्टर म्हणाले २० लाख रुपये भरावे लागतील, ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जा असं रुग्णाच्या समोर म्हणाले रुग्ण याचा बी पी वाढले आणि यात त्यांना खूप टेन्शन आलं रुग्णाला ओ पी डी मध्ये शिफ्ट केलं, २ तास रुग्ण तिथेच होता एक ही डॉक्टर तिथे रुग्णाला बघायला आलं नाही पूर्ण १० लाख रुपये भरा त्याशिवाय पेपर करणार नाही असं मीनाक्षी गोसावी या तिथल्या डॉक्टर म्हणाल्या ५ लाख रुपये भरा तेव्हा उपचार होतील डॉक्टर यांचे नाव सुश्रुत घैसास यांनी स्वतः सांगितले की १० लाख रुपये भरा आम्ही ३ लाख रुपये भरायला तयार होतो, या सगळ्यात २,३ तास लागले दीनानाथ मंगेशकर, डॉ सुश्रुत घैसास, बिलिंग डिपार्टमेंट मधील मॅडम जबाबदार आहेत उपचार वेळेत झाले असते तर वाहिनी वाचली असती   सकाळी ९ वाजता पोहचलो  त्यांनी २० लाखांचं कोटेशन मांडले ते ही पेशेंटसमोर मांडले  १० लाख भरुन पुढचे उपचार करु  आम्ही सांगितले तुम्ही आधी उपचार करा आम्ही पैसे भरतो  पण जो पर्यंत १० लाख भरत नाही तोपर्यंत उपचार करु नका असा त्यांना वरुन फोन आला  १० लाखांची त्यांनी डायरेक्ट मागणी केली आणि ते भरायला सांगितले  अक्षय पाटे, भिसे कुटुंबाचा जावई आम्ही १० लाख रुपयांची तजवीज करायला सुरुवात केली होती पण त्यांनी उपचार करायला सुरुवात सुद्धा केली नव्हती कुठला ही उपचार त्यांनी रुग्णावर केला नाही ऐपत नसेल तर ससून मध्ये जा असं डॉक्टर यांनी सांगितल्यावर रुग्ण स्वतः डिप्रेशन मध्ये गेला स्वप्नील, सुशांत भिसे यांचा मित्र एका प्रशासकीय कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीवर अशी वेळ येत असेल तर सामन्यांचे काय मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील फोन जात असतील तरी त्याला नाकारले जात आहे सामान्य माणसांवर काय वेळ येत असेल माध्यमांनी दखल घेतली म्हणून आम्ही आता समोर आलो आहोत भविष्यात नक्कीच पुढील तक्रार करू डॉक्टरला निलंबित करावे