¡Sorpréndeme!

Sharad Pawar Ajit Pawar Special Report : शरद पवारांनी अजितदादांवर कोणती कृपा केली?

2025-04-03 1 Dailymotion

काका सांगा कुणाचे?, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलीय...कारण ज्या काकांना सोडून अजितदादा सत्तेत आलेत, त्याच काकांची आठवण त्यांनी काढली...तेही अगदी जाहीर सभेत...आणि काकांची आपल्यावर कृपा असल्याचंही बिनदिक्कत सांगितलं...आता हे सांगण्यासाठी काही घडलं कारण होतं, का तर नाही...मग अजितदादांच्या या अवचित वक्तव्याचं कारण काय?...काकांची कृपा आहे हे सांगून अजितदादा काय सुचवू पाहतायत, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत...पाहुयात त्यासंदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट... 
बेधडक, अघळपघळ, सडेतोड...  जे पोटात तेच ओठावर...  अजितदादांचं काम म्हणजे खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी...  बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची शाळा घेताना दादा बोलता बोलता काकांवर बोलून गेले...आणि ब्रेकिंग न्यूज झाली...  दादांचं आता जे काय बरं चाललंय ते कुणामुळे, याचा गौप्यस्फोट जाहीररित्या दादांनीच केला...  आणि महाविकास आघाडीचेच काय महायुतीचेही कान टवकारले गेले... 
दादांच्या वक्तव्याचा जो तो आपापल्या परीनं वेगवेगळे अर्थ काढायला लागला...  जेव्हा पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गाठलं तेव्हा त्यांनी दादांच्या वक्तव्याचं त्यांच्या सोयीनुसार विश्लेषण केलं... 

Sharad Pawar Ajit Pawar Special Report : शरद पवारांनी अजितदादांवर कोणती कृपा केली?