¡Sorpréndeme!

Thackeray Vs BJP Waqf Amendment bill : वक्फचा तराजू हिंदुत्वाचं मोजमाप; भाजप Vs ठाकरे जुंपली

2025-04-03 25 Dailymotion

गेले २ दिवस वक्फ दुरुस्ती विधेयकाची जितकी चर्चा देशात सुरु आहे..तितकीच चर्चा इंडिया आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या भूमिकेची राज्यात सुरु आहे. लोकसभेत ठाकरेंच्या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यावरुन भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतलं ठाकरेंचं एक वाक्य नंतरही जास्त ट्रेंड झालं ते वाक्य होतं 'कहना.. क्या.. चाहते.. हो'.. हा काय प्रकार आहे चला पाहुयात .
वक्फ सुधारणा विधेयकामुळे सगळ्यात मोठी गोची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची झालेली दिसतेय.  त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी  पत्रकार परिषद घेतली.  त्यांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं.  मुस्लिमांचं लांगुलचालन करण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरेंनी भाजपला मोहम्मद अली जिनांच्या पंक्तीत आणून बसवलंय.  
एकिकडे हे विधेयक मुस्लिमांसाठी चांगलं आहे म्हणून भाजप मुस्लिमधार्जिणे आहे असं त्यांना सांगायचं होतं तर दुसरीकडे विधेयकाच्या विरोधात आपल्या खासदारांनी केलेलं मतदान जस्टीफाय करायचं होतं.