केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय...यावरून दोन शिवसेनेमध्ये संघर्ष पेटलाय...एक शिवसेना विधेयकाच्या बाजूनं आहे तर दुसरी शिवसेना विधेयकाच्या विरोधात...हिंदुत्वाचा दाखला देत दोन्ही सेना एकमेकांवर वार पलटवार करतायत...आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालीय...ठाकरेंच्या सेनेला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याची भीती दाखवण्यात येतेय...पाहुयात दोन्ही सेनेतल्या संघर्षाचा हा स्पेशल रिपोर्ट...
मुद्दा वक्फ सुधारणा विधेयकाचा... प्लॅटफॉर्म संसदेचा... प्रतिष्ठा मोदींची पणाला... आणि जीव मात्र ठाकरेंचा टांगणीला...
वक्फ आणि हिंदुत्वावरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा गद्दारीपर्यंत घसरला...
उद्धव ठाकरेंनी वक्फवरून भाजपच्या हिंदुत्वावर प्रहार केला... पण याच मुद्द्यावरून खुद्द ठाकरेच कोंडीत सापडल्यानं शिंदेसेना त्यांच्यावर तुटून पडली...
एकमेकांवर टीका करताना ठाकरे आणि शिंदेंची गाडी पक्षांच्या नावाच्या शॉर्टफॉर्मपर्यंत घसरली...
विचारसरणी हिंदुत्वाची...पण राजकीय अपरिहार्यतेमुळे मुस्लिमांचा कैवार घेण्याची वेळ...अशा कात्रीत ठाकरे सापडलेत... ठाकरेंच्या या द्विधा मनस्थितीमुळे शिंदेंसेनेला त्यांचे खासदार कसे गोंधळेत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेसेनेनं सुरू केलाय...