Pune:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापेक्षा पैसे महत्वाचे? रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू
पुण्याचं नामांकित दीनानाथ मंगेशकर रूग्णालय सध्या वादात सापडलंय... निमित्त ठरलंय, तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू... या महिलेच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आलाय...तनिषा भिसेंना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं.. तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाने १० लाखांची मागणी केली होती.. पण अडीच लाख भरायला तयार असूनही रुग्णालयाने दाखल करुन घेतली नाही, अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केलीय... दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयातून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला.. पण तनिषा भिसेंचा दुर्दैवी मृत्यू झाला... याप्रकरणी भाजप आमदार अमित गोरखेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाला फोन करूनही रूग्णालय प्रशासनाने ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आलीये, यावर आता रूग्णालय प्रशासन स्पष्टीकरण देणार का असा सवाल उपस्थित होतोय...सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिलीये...शी केली जाणार, असंही ते म्हणालेत...