Donald Trump : ट्रम्पनी भारतावर लावलेला कर नेमका काय? काय महागणार? सोप्या भाषेत A टू Z
Donald Trump : ट्रम्पनी भारतावर लावलेला कर नेमका काय? काय महागणार? सोप्या भाषेत A टू Z
अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका... भारतावर २६ टक्के कराची घोषणा, ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे आयात शुल्क लागू करण्याची घोषणा बुधवारी रात्री उशिरा केली. भारतावर २६ टक्के आयात शुल्क लादण्यात येणार आहे. चीनवर ३४ टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसू शकतो. कृषी, मौल्यवान खडे, रसायने, औषधनिर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांना या निर्णयाचा फटका बसेल.तर भारताचं वाणिज्य खातं याचा काय परिणाम होईल हे तपासत आहे. मात्र हा फार मोठा फटका नाही असं वाणिज्य विभागाचं मत असल्याची माहिती आहे.