¡Sorpréndeme!

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde:'मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडून मुस्लिमांचं लांगुलचालन'

2025-04-03 0 Dailymotion

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde:'मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडून मुस्लिमांचं लांगुलचालन'
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde:'मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं भाजपकडून मुस्लिमांचं लांगुलचालन' 
वक्फ सुधारणा विधेयकावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपसह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं लांगुलचालन भाजपने मुस्लिमांचं सुरू केलंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय..तसंच वक्फच्या जमिनींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे असा आरोप त्यांनी केला. आपल्या मित्रांच्या घशात वक्फच्या जमिनी घालण्याचा कट सरकार आखतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले.तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं...
मोहम्मद अली जिनांनाही लाजवेल असं लांगुलचालन भाजपने मुस्लिमांचं सुरू केलंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. भाजपवाल्यांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या आणि बिल मांडलं अशी टीका त्यांनी केलीय. वक्फ विधेयकात काही चांगल्या गोष्टीही आहेत. मात्र भाजपचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे अशी टीका त्यांनी केली. वक्फच्या जमिनींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा आहे असा आरोप त्यांनी केला. आपल्या मित्रांच्या घशात वक्फच्या जमिनी घालण्याचा कट सरकार आखतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले.