¡Sorpréndeme!

Public Safety Bill Vastav148:जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून गळचेपी?पत्रकारांवर आंदोलन करण्याची वेळ

2025-04-03 0 Dailymotion

Uddhav Thackeray on Waqf Amendment Bill 2025 : अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. यावरून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केलाय. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज ३ एप्रिल आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल 15-30 दिवसांआधी अमेरिकेने सांगितलं की, तुम्ही कर कमी करा, नाहीतर आम्ही कर वाढवू. कर वाढवले आहे. आता बाजार कोसळला आहे. आर्थिक संकट असताना, काय पाऊले उचल्याची गरज आहे. ही भूमिका सरकाराने घेतली पाहिजे होती.  हे देशासमोर येणारं आर्थिक संकट पंतप्रधान मोदींनी सांगायला हवं होतं. त्यावर काय करायचे असं ते म्हणाले असते तर आम्ही एकमुखाने सोबत राहिलो असतो. आज तरी लोकसभेत, राज्यसभेत आर्थिक संकटाबद्दल अर्थ मंत्र्यांनी तरी अवगत केलं पाहिजे. आज हे करणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले.