¡Sorpréndeme!

Mohan Bhagwat Speech Nagpur : पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय हेच संघाचे आदर्श

2025-04-03 0 Dailymotion

Bhagwat Speech Nagpur : पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय हेच संघाचे आदर्श

 युगंधर शिवराय, नियोजन आणि व्यवस्थापनाचे दीपस्तंभ" दिवंगत डॉ सुमंत टेकाडे यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे आज नागपुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते विमोचन होत आहे.. नागपूरच्या मुंडले सभागृहात हे कार्यक्रम होत आहे..   सरसंघचालक मोहन भागवत बोलत आहे  शिवाजी महाराज युगंधर युग प्रवर्तक का.. तर सिकंदरच्या काळापासून परकीय आक्रमणाची परंपरा होती.. नंतर इस्लामिक आक्रमण झाले.. विजयनगर लढला, राजस्थान लढला.. अनेकांनी संघर्ष केले.. एवढा पराक्रम असून ही सुटका झाली नव्हती.. प्रयोग चालत होते, उपाय सापडत नव्हते.. तो उपाय शिवाजी महाराजांनी दिला.. शिवाजी आग्र्यातून सुरक्षित परत येतात की नाही याची ही याची वाट पाहत होता.. ते सुखरूप आले, सर्व परत मिळवलं आणि राजे झाले.. तिथून परकीय राजवट संपुष्टात यायला सुरुवात झाली...  हे शिवाजी महाराजांनी करून दाखवले..   म्हणून शिवाजी महाराजांची प्रेरणा तेव्हा पासून आजही तशीच कायम आहे..  हेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांनी अनेक वेळेला सांगितले की संघाचा काम तत्वरूप काम आहे, व्यक्तिवादी काम नाही.. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आदर्श मानले नाही. मात्र, संघाला आदर्श शोधायचे असेल तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात शिवाजी महाराज हेच आदर्श राहिले आहे.. म्हणून आज ही शिवाजी महाराज ही आपण सर्वांचे आदर्श आहे..  शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले कारण त्यांना कृतीतून दाखवून द्यायचे होते, की स्वराज्य निर्माण होऊ शकतो, टिकू शकतो.. ते दाखवायचे होते, म्हणून ते राजे झाले..  शिवाजी महाराज हे शिखरावरच जन्माला आले नाही.. तर ते त्या पर्वताच्या कुठल्या तरी उंची वर जन्माला येऊन शिखरावर गेले.. सर्वच महापुरुष असेच उंचीवर गेले.. काही ना ते जिथे जन्मले तिथून पाच पावले वरच्या दिशेने जावे लागले.. आणि काहीना हजारो पाऊल चालावे लागले..  आपण ही किमान पाच पावले तर चालावे...आपण हिंदू असल्याने पुनर्जन्मात आपली श्रद्धा आहे.. त्यामुळे या जन्मी जे प्रयत्न अर्धवट राहिले, ते आपण मनापासून करत असो तर ईश्वर पुढच्या जन्मी पुन्हा संधी देतो..  शिवाजी महाराजांच्या हजार गुणांपैकी किमान दोन गुण आपण अंगिकारावे आणि तसे जगावे..