Sanjay Raut Full PC : मुस्लिमांच्या अडीच लाख एकरच्या प्रॉपर्टीवर आपला हक्क व्हावा यासाठी हे बिल
आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना उबाठाची भूमिका याबद्दल स्पष्ट करतील काल पहाटे लोकसभेत हे विधेयक मंजूर केलं या बिलामुळे देशात काय झालं या देशात मुस्लिमांचा काय उद्धार होणार आहे यामुळे मुस्लिमांच्या मालकीच्या अडीच लाख एकरच्या प्रॉपर्टीवर आपला हक्क व्हावा यासाठी हे बिल आहे अमित शाह यांच्या तोंडून एक सत्य बाहेर प़डलं की मशिदी,मदशांना ते हात लावणार नाही मात्र रिक्त जमिनींची विक्री करू आणि तो पैसा गरीब मुस्लिम महिलांसाठी वापरू याचा अर्थ खरेदी-विक्री, सौदा करणार हे सत्य आहेच..या जमिनीची किंमत २ लाख कोटी आहे या मोकळ्या जमिनी कोण कुणाला विकणार हेच पहावे लागेल या देशात विकणारे दोन आणि विकत घेणारेही दोन...याशिवाय तिसरा कोण आहे.. हा सगळा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून काल आम्ही याविरोधात मतदान केलं या देशाचा राष्ट्रीय खेळ आधी होता हॉकी आता क्रिकेट आणि आयपीएल आहे सध्या देशात धार्मिक आयपीएलचा खेळ सुरू आहे यांना सगळी मुस्लिम धर्माची संपत्ती स्वप्नात दिसते देवेंद्र फडणविसांना दिवस-रात्र-पहाटे अजूनही ओरिजनल शिवसेनेची भिती वाटते कारण देवेंद्र फडणविसांना माहिती आहे की त्यांना फक्त आम्हीच वेळोवेळी एक्स्पोज करतो मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाच्या जमिनींचे आधीच सौदे झाले आहेत आणि त्यासाठीच हे विधेयक आणून मंजूर करून घेण्याची घाई आहे काल कधी नव्हे इतकं लांगुलचालन लोकसभेत केलं गेलं... जिना नाही, ओवैसी नाही, शाहबुद्दीन यांनीही कधी केलं नव्हतं. यांना काँग्रेसनं मिळवलेलं स्वांतत्र्य चालतं.. हे अत्यंत मूर्ख आणि स्वार्थी लोक आहेत. मुंबईत वक्फ बोर्डाच्या यतिमखान्याची जमीन आहे ज्याच्यावर एका उद्योगपतीनं आपलं साम्राज्य उभं केलं आहे भाजपमधील हे बाडगे इतर पक्षांतून येतात आणि आम्ही बोलायला उभे राहिलो की आम्हाला डिस्टर्ब करतात भाजपकडे बहुमत आहे..लोकसभेत जे बिल मंजूर झालं ते 300 ही पार करू शकलं नाही..बहुमताचा आकडा 283 आहे त्यांना 288 मिळाले उलट विरोधक एकजूट होते ट्रम्पने लावलेलं टेरिफ आज आलं आणि त्यामुळे देशाचं होणारं नुकसान, देशातील महागाई, गरिबी या सगळ्यांवरून लक्ष हटवावं म्हणून काल हे बिल सादर केलं आणि त्यावर चर्चा करतायत आज राज्यसभेत मला बोलण्याची संधी मिळाली तर नक्की बोलणार