¡Sorpréndeme!

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 03 April 2025

2025-04-03 0 Dailymotion

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 03 April 2025

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर...विधेयकाच्या समर्थनात २८८ तर विरोधात २३२ मतं...आज राज्यसभेत कसोटी...

ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान, वक्फची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

वक्फमध्ये कोणताही मुस्लिमेतर सदस्य नसेल, अमित शाहांचं लोकसभेत स्पष्टीकरण... वोट बँकेसाठी अल्पसंख्याकांना घाबरवलं जात असल्याचा शाहांचा विरोधकांवर आरोप.

असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत चर्चेदरम्यान वक्फ दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडली, मुस्लिमांचा अपमान करण्याचा विधेयकाचा उद्देश असल्याचा आरोप तर ओवैसींचं कृत्य घटनाबाह्य, भाजपचा संताप

मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवर लोकसभेची मोहोर, रात्री दोन वाजता झाली मणिपूरवर चर्चा, मणिपूरमध्ये जनजीवन सामान्य करण्यावर सरकारचा भर असल्याचं अमित शाहांचं निवेदन...

अजित पवारांच्या बीड दौऱ्याकडे पाठ फिरवत धनंजय मुंडेंची मुंबईत फॅशन शोमध्ये उपस्थिती...आजारपणाचं कारणं देत धनंजय मुंडेंची दौऱ्याला दांडी...

पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श, मोहन भागवतांचं वक्तव्य... तर शिवराय १०० टक्के सेक्युलर होते, नितीन गडकरींचं विधान