¡Sorpréndeme!

Special Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?

2025-04-02 0 Dailymotion

Special Report Waqf Amendment Billवक्फ सुधारणा विधेयक सादर,जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल काय?
सरकारने लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. मंत्रिमंडळाने १९ फेब्रुवारीला या विधेयकाला मंजुरी दिली होती. जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे हा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. याला अर्थातच इंडिया आघाडीने विरोध केलाय, एनडीए सरकारला मात्र विधेयक मंजूर होणार याची खात्री आहे. या सुधारणांनी काय बदल होणार? या दुरुस्तीनंतर धार्मिक बाबीत सरकारचा हस्तक्षेप खरंच वाढेल का? जुन्या आणि नव्या कायद्यातील मोठे बदल आहेत तरी काय? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.
Unified Waqf Management, Empowerment, Efficiency, and Development Act म्हणजे उम्मीद असं या कायद्याचं नाव असलं तरी  अगदी सुरुवातीपासूनच या विधेयकावरुन वाद सुरु होता.   त्याचा वादाचा पुढचा अंक आज लोकसभेत पाहायला मिळाला  वक्फ विधेयक म्हणजे मोदी सरकारची धार्मिक बाबीतली ढवळाढवळ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे..  या आरोपाला अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी काय उत्तर दिलंय