¡Sorpréndeme!

Dhananjay Deshmukh : Ajit Pawar यांच्या समोर आमच्या मागण्या मांडल्या,भेटीनंतर देशमुखांची प्रतिक्रिया

2025-04-02 0 Dailymotion

मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुखांचे धाकटे बंधू, धनंजय देशमुखांनी आज दुपारी.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.. गेवराईचे आमदार अमरसिंह पंडितांच्या घरी, धनंजय देशमुख आणि अजित पवारांची १० मिनिटं चर्चा पार पडली.. या बैठकीत धनंजय देशमुखांनी बीडमधली सध्याची परिस्थिती त्यांच्या कानावर टाकली.. तसंच तक्रारींचा आणि मागण्यांचा ड्राफ्टही तयार केला..  
अमरसिंह पंडित यांच्या शिवछत्र या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली... गेल्या तीन महिन्यातील प्रशासनाच्या गोंधळाबाबतची माहिती देशमुखांनी अजित पवारांनी दिली...जिल्हा न्यायालयातील आरोपींच्या हाणामारी बाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे... 
अजित पवारांनी आज दिवसभर बीडचा दौरा केला... बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय..अर्थसंकल्पापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार बीडमध्ये आले होते. त्यानंतर पालकमंत्री म्हणून हा त्यांचा दुसरा दौराय.. दरम्यान धनंजय देशमुखांनी आज दुपारी.. उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली..