¡Sorpréndeme!

Abu Azami on Waqf Amendment Bill : वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही

2025-04-02 0 Dailymotion

Abu Azami on Waqf Amendment Bill : वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही

वक्फ दुरुस्ती विधेयकाला जे समर्थन करत आहेत ते खोटे मुस्लिम आहेत, खरे मुस्लिम वक्फ विधेयकाच्या विरोधात उभे आहेत. जोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत ही जमीन अल्लाहच्या नावावर राहील. जी काही कमतरता आहे ती आपण दुरुस्त करू, मात्र तसे न करता आपण संपूर्ण कायदाच बदलू का? असा सवाल  करत  समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी वक्फ बिलाबद्दल (Waqf Amendment Bill) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि एनडीएच्या सेक्युलर लोकांनी हे विधेयक मंजूर होऊ देऊ नये. असे आवाहन देखील त्यांनी केले आहेत.

सरकार ज्यांच्या ताब्यात आहे त्या लोकांना मुस्लिमांना अपमान करण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची सवय आहे. मुस्लिमांचा अपमान आणि छळ करण्यासाठी प्रथम सीए एनआरसीचा मुद्दा आणला, पण तो आमच्यासाठी दगड आणि इतरांसाठी फूलं असा ठरला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे? देश सोडावा का? किंवा आम्हाला विष द्या, आम्हाला मारा. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन UCC लागू करता येईल. वक्फमधील दुरुस्ती आम्ही कधीही सहन करू शकत नाही. जोपर्यंत मुस्लिम पर्सनल बोर्ड हे मान्य करत नाही, तोपर्यंत देशातील एकही मुस्लिम हे मान्य करणार नाही, भारत सरकार आदेश आणेल, मात्र आम्ही हे मान्य करणार नाही. असा इशाराही आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.