Ajit Pawar Beed Daura : अजित पवार बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडेंची दांडी एक्स पोस्टद्वारे माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे मात्र अनुपस्थित राहतील अशी माहिती मिळतीय. प्रकृती ठीक नसल्याने अजित पवारांच्या दौऱ्यात उपस्थित राहू शकत नाही असं धनंजय मुंडेंनी कळवलय. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. आज अजित पवारांचा बीड दौरा आहे. कारागृहामध्ये जो प्रकार घडला, मारहाण झाली, त्यानंतर अजित पवारांचा होणारा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मान. सध्या बीडच पालकमंत्री पद देखील अजित पवारांकडे आहे पण या संपूर्ण दौऱ्यामध्ये धनंजय मुंडे अजित पवारां सोबत नसतील धनंजय मुंडेनी ट्वीट करून आपली प्रकृती बरी नसल्यामुळे आपण या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याच सांगितलेले दरम्यान आजच्या बीड दौऱ्या दरम्यान अजित पवार कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतात, काय काय सूचना करतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकृती ठीक. संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये ही विनंती कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत कृष्णा अजित पवारांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा कोणकोणत्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल कोणा कोणाशी गाठी भेटी होतील आणि धनंजय मुंडेंची अनुपस्थिती जरी प्रकृतीच्या कारणास्तव असली तरी त्याचीही चर्चा होणार आहे. अजित पवार अगदी काही वेळातच बीड मध्ये पोहोचतील आणि त्यानंतर वेगवेगळ्या. त्यांचे दिवसभर कार्यक्रम आहेत, अनेक नेत्यांच्या घरी भेटी आहेत, त्याचबरोबर पक्षाचा मेळावा आहे. एका दैनिकाच्या कार्यक्रमाला देखील ते उपस्थित राहणार आहेत. मात्र हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा होता की अजित पवार जिल्ह्यात येत आहेत आणि धनंजय मुंडे यांच मंत्रीपद गेल्यानंतर पहिल्यांदाच ते शहरामध्ये या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे प्रश्न हा होता की धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार किंवा नाही, मात्र आता त्यांनीच या ठिकाणी स्पष्ट केलेल आहे की प्रकृती अस्वस्त्यामुळे ते या ठिकाणी दौऱ्याला उपस्थित राहणार नाहीत. दुसरीकडे पंकजा मात्र त्यांच्या सोबत काही कार्यक्रमामध्ये या ठिकाणी असणार आहेत आणि त्याचच एक दृश्य मी तुम्हाला दाखवतो. हे जे बॅनर आहे हे पंकजा मुंडे यांच बॅनर आहे म्हणजे पंकजा मुंडेंच्या स्वागताच बॅनर आहे.