Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर 3 वाहनांचा भीषण अपघात,पाच जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले आहे. तर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात (Buldhana Accident) झाला आहे.
भीषण अपघातात 5 जण ठार, 24 जण जखमी
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.