उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं तयार करणारा, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा अडचणीत आलाय, अशातच त्याचे प्रेक्षकही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे... कारण मुंबई पोलिसांनी कामराच्या प्रेक्षकांना कलम १७९ अंतर्गत नोटीस बजावली... कुणाल पाठोपाठ त्याच्या प्रेक्षकांना नोटीस पाठवण्याचं कारण काय असू शकतं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहुया..
कुणाल कामरानं आता एक नवं ट्वीट केलंय. आणि त्यातून त्यानं पुन्हा एकदा सरकारविरोधात भाष्य केलंय. 'कलाकाराची लोकशाही पद्धतीनं पद्धतशीर हत्या' असा आशय कुणालनं त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलाय. त्याचं झालं असं की दुसऱ्यांदा समन्स बजावूनही कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. हे पाहून मुंबई पोलीस सोमवारी कामराच्या मुंबईतल्या घरी पोहोचले... कामरा गेल्या 10 वर्षांपासून तमिळनाडूमध्ये राहत असल्यानं तो कधी येईल त्याविषयी माहिती नसल्याचं कुणाल कामराच्या वृद्ध आई वडिलांनी पोलिसांना सांगितलं. आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी चक्क कुणाल कामराच्या त्या शोसाठी आलेल्या प्रेक्षकांनाच चौकशीचं समन्स पाठवायचा निर्णय़ घेतलाय. त्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय.