¡Sorpréndeme!

Special Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?

2025-04-01 2 Dailymotion

Special Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार? 
ठाकरे गटाचा आणि संजय राऊतांचा एक वेगळाच सामना सुरु आहे.. सध्या राऊतांचा सगळा फोकस भाजपवर आहे.. सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी राजकारणातून रिटायर होणार अशी आवई कम भविष्यवाणी करुन राऊत मोकळे झाले आहेत. फडणवीसांना मोदींचा वारसदार जाहीर करुन आणखी एक काडी टाकायचा प्रयत्न त्यांनी केलाय. संजय राऊत यांच्या जाळ्यात भाजपचे नेते अडकतील का? भाजपमधील काही लोकांच्या डोक्यात संशय कल्लोळ निर्माण होईल का? राऊत वटवत असलेल्या कळीच्या नारदाच्या भूमिकेला यश येईल का? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट 
ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत हात धुवून मोदींच्या निवृत्तीच्या मागे लागले आहेत का आणि का लागले आहेत असे प्रश्न विचारले जातायत..
याचं कारण आहे, सलग तिसऱ्या दिवशी संजय राऊतांनी मोदींच्या निवृत्तीची तारीख जाहीर केलीय..
सप्टेंबर मध्ये म्हणजे या सहा महिन्यात मोदी निवृत्ती होणार अशी भविष्यवाणीही सामनाच्या अग्रलेखात वर्तवण्यात आलीय. 
खरं तर फडणवीसांनी या प्रकरणावर सविस्तर उत्तर सुद्धा दिलं होतं, राऊतांच्या विचारांची मुघलांसोबत तुलना सुद्धा केली होती, यात  राऊतांनी तात्काळ संधी शोधली आणि आज प्रत्युत्तर दिलं. मोदींच्या उदयानंतर लालकृष्ण अडवाणींना अडगळीत टाकलं अशी टीका करत भाजपची शाहजहानशी तुलनाही करुन टाकली. 


काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा राऊतांच्या सूरात सूर मिसळला. भाजपकडून किल्ला लढवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि चित्रा वाघ सुद्धा उचलली. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं ट्विट बावनकुळेेंनी केलं. तर चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना शालीजोडीतले मारुन घेतले.