¡Sorpréndeme!

Anjali Damania On Rajendra Ghanwat : राजेंद्र घनवट यांनी बीडच्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला:दमानिया

2025-04-01 1 Dailymotion

बीडमधल्या शेतकऱ्यांना छळून त्रास दिला जात दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचाही आरोप दमानियांनी केलाय... मयत व्यक्तीला जिवंत दाखवून, किंवा काही केसेसमध्ये जिवंत व्यक्तींना मयत दाखवून घनवट यांनी व्यवहार केल्याचा आरोप दमानियांनी केलाय. घनवट यांच्या मागे धनंजय मुंडेंच आहेत, कारण घनवट हे मुंडेंचे पार्टनर आहेत असा स्पष्ट आरोप देखील त्यांनी केला.
((एकूण ११ शेतकऱ्यांची छळवणूक झाल्याचा दावा दमानियांनी केला. जमिनी लाटण्यासाठी शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात, त्यांना पोलीस आणि कोर्टाच्या प्रक्रियांमध्ये अडकवलं जातं असा दावा देखील दमानियांनी केला. ))याबाबतचे सर्व पुरावे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देणार असल्याचं दमानिया म्हणाल्या..