Prithviraj Chavan : शेतकऱ्यांची कर्जमाफी ते बांगलादेशी घुसखोरी,पृथ्वीराज चव्हाणांचं विश्लेषण
आम्हीसुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी मागणार नाही पण... अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी मागणार नाही असे बोलताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला हमीभाव देणे बरोबरच उसाला एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा म्हणणार नाही असं बोलताना शेतकऱ्यांनी आता तरी जागं झालं पाहिजे आणि या शेतकरीविरोधी सरकारचा पडदा पास केला पाहिजे असं चव्हाण यांनी सांगितले. बांगलादेशी घुसखोरी होत असेल असा भाजपच्या नेत्यांचा आरोप असेल तर याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे - पृथ्वीराज चव्हाण मागील काही दिवसांमध्ये भाजपच्या काही नेत्यांकडून बांगलादेशी घुसखोरांच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य करण्यात येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने या बांगलादेशी घुसकूरांना या ठिकाणी आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड हे बनावट बनवून दिलं जात असल्याचा असा देखील आरोप करण्यात येत आहे याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी जर असा भाजपच्या नेत्यांचा आरोप असेल तर मागील काही वर्षांपासून सत्ता ही भाजपचीच असून हे आरोप म्हणजे हा नरेंद्र मोदी यांच्यावरच आक्षेप असल्याचे बोलले गेले सोबतच त्यांनी याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनीच द्यावे असेही म्हटलं... मी कोणालाही माझं वकील पत्र दिलं नाही सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी जे काही माझ्या नाव घेऊन मी कोणाला पाठिंबा दिलाय हे सांगण्यात येते हे पूर्णपणे दिशाभूल करणार आहे मी कोणालाही माझं वकील पत्र दिलं नाही. तसेच मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. तसेच माझं नाव घेऊन काँग्रेसचा कोणता कार्यकर्ता काही सांगत असेल तर ते दिशाभूल करणार आहे मला जे सांगायचं आहे ते मी सर्वांसमोर सांगेन असेही चव्हाण यांनी सांगितले.